एक ९९ वर्षाचा म्हातारा डॉक्टरकडे वार्षिक तपासणीसाठी आला.
तपासणी झाल्यावर डॉक्टरांनी विचारले," आता कसे वाटते?"
तो म्हणाला, " मी या वर्षी खुप खुष आहे. मला २५ वर्षांची बायको आहे आणि ती ७ महिन्यांची गर्भवती आहे."
डॉक्टर - " हे कसे शक्य आहे?"
म्हातारा - " म्हणजे?"
डॉक्टर - " तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. माझा एक मित्र अट्टल शिकारी आहे. शिकारीचा एकही मोसम तो वाया घालवत नाही. बंदुकीच्या एका गोळीत शिकार करतो. तर झाले असे, गेल्या वर्षी शिकारीला जाताना गडबडीत त्याने बंदुकीऐवजी छत्री हातात घेतली आणि गेला शिकारीला.
म्हातारा - " मग?"
डॉक्टर - "जंगलात वाघ दिसला. त्याने छत्री अशी बंदुकीसारखी हातात धरली आणि छत्रीची मूठ दाबली. वाघ खल्लास!!!"
म्हातारा - "हे कस शक्य  आहे? गोळी कुणी दुसऱ्याने मारली असेल."
डॉक्टर म्हणतो- " मलाही हेच म्हणायचे आहे.!!!"