वरदा, अभिप्रायाखातर धन्यवाद.

अँजिओप्लास्टी साठी हृदयधमनीरूंदिकरण हा शब्द बरोबर आहे, मात्र फार मोठा आहे. हृदयातून इतर शरीरास शुद्ध रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तनलिकेस धमनी म्हणतात, इतरांना नाही. त्यामुळे हृदयधमनीरुंदीकरणा ऐवजी केवळ धमनीरुंदीकरण वा धमनीविस्तार असा शब्द वापरला तर? त्यामुळे शब्द जरा छोटा होईल आणि बोजडपणाही कमी होईल असे वाटले.

मात्र, हृदयातून सर्व शरीरास शुद्ध रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांना धमनीच म्हणत असले तरी रुंदीकरण केल्या जाते ती धमनी सामान्यतः हृदयस्नायूसच रक्त पुरवित असते. तेव्हा हृदयधमनी म्हणावेच लागणार आहे, मात्र रुंदीकरणाऐवजी विस्तार हा शब्द सुटसुटीत वाटतो आहे. त्याचा नक्कीच विचार करता येईल.