राधिका, एकलव्य,
प्रतिसादांबद्दल आभारी आहे.
बाकी हे "दो-स्त्रि-ए-आ-की-प-फू" काय आहे ते कळले नाही.
'' स्त्री-सदस्यांची ऐक्यभावना आयतीच मदतीला येते.''
यावर पुनर्विचार करावासा वाटतो का पहा. कारण 'दोन स्त्रिया एकत्र आल्या की पडलीच फूट' असे म्हणून आत्तापर्यंत बिचाऱ्या स्त्री वर्गाला पार बदनाम करून टाकलंय हो. हे चित्र पालटल्याचे कानावर आले नव्हते. मनोगतावर क्रांतीच झालीय म्हणावे लागेल असे असेल तर.
"दो-स्त्रि-ए-आ-की-प-फू" असे मनोगतावर तरी दिसले नाही. क्रांतीबाबत सहमत आहे. मनोगताने आणि मनोगतींनी अनेक बाबतीत क्रांत्या ("क्रांती" चे बहुवचन काय आहे?) केल्या आहेत असे निरीक्षण आहे.
लेखाच्या प्रती लाखमोलाने खपत आहेत असे ऐकतो... पुढील आवृत्ती किंवा आणखी छान म्हणजे खिशातली पुस्तिका किंवा झटपट मनोगती असे काही लवकरच बाजारात आणावीत