सौंदर्यसाधना आवडली. दुरून पाहिलेले आणि ऐकलेले सगळे अनुभव आठवले. "लखुमाई त जा किंवा आमच्या गल्लीच्या कोपऱ्यावर जा. सौंदर्यप्रसाधनगृहं पैशालाअ पासरी झाली आहेत आणि तिथे अव्वाच्या सव्वा भावात खिसे मोकळे करून मिळतात. एवढं करूनही मुली जश्शाच्या तशाच दिसतात.. " असे जुन्या पिढीचे मत (शेलक्या विशेषणांसहित) आठवले. वाचताना मजा वाटली. माझा या प्रक्रियेशी संबंध सुदैवाने अजून आला नाही पण एकदा जाऊन अनुभव घ्यावासा वाटतोय.
(सातीताई, तुम्हाला ओष्ठशलाका न फिसकटवता नीट वापरता येते का हो? असल्यास मला ट्रेनिंग द्याल का?)

--अदिती