काव्याचा अर्थ जर कवीला गद्यात उलगडून सांगावा लागला तर ते काव्य फसले असे मी मानतो.त्या दृष्टीने किमान आपल्या दोघांच्या बाबतीत तरी ही कविता फसली‌. शक्य असतं तर मी ती काढून टाकली असती पण मनोगतच्या नूतनीकरणानंतर 'काढून टाका' हा पर्याय उपलब्ध नाही. कवीला जे काही म्हणायचे ते काव्यात उतरलेले असते.त्यानंतर केली जाते ती समीक्षा.
दुसरा मुद्दा
'सत्य शिव सुंदर ह्या मर्यादेत बसणार्‍या नवनवीन विषयांवर काव्य निर्माण झाले तर ते स्वागतार्हच आहे. '
'माननीय प्रवासी हे अतिशय हुशार आणि ज्ञानी आहेत.'
प्रवासींच्या हुषारी व ज्ञानाबद्दल मला मुळीच संदेह नाही. मात्र सत्य हे कैकदा सुंदर नसतं.खर तर बर्‍याचदा कटूच असतं. अन् जे लिखाण आयुष्याच्या इंद्रधनुष्यी, रंगीबेरंगी बाजुस बगल देऊन करड्या,काळ्या बाजूस दाखवते ते त्यांना फारसे पसंत पडत नाही हे यापूर्वीही त्यांच्या प्रतिक्रियेतून वेळोवेळी स्पष्ट झाले आहे.आवड-निवड सरतेशेवटी वैयक्तिक असते.त्यास कोणतेही सर्वमान्य निकष लावता येत नाही.कोणास खीर आवडते, कोणास कारल्याची भाजी.यात चूक-बरोबर हा प्रश्न अप्रस्तुत असतो.दोघांचही बरोबर असतं.दृष्टीकोनाचा फरक असतो. तेव्हा ज्याने-त्याने आपापल्या मतास कवटाळून बसावे.Let us agree to disagree.शेवटी कविता लिहिणे आणि न्यायालयात साक्षी-पुराव्यानिशी आपली बाजू मांडणे ह्या दोन सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत.

आपला,
मिलिंद