"भाऊचा धक्का" हे शीर्षक छानच आहे.
शशांक म्हणतात तसे पियु मामेबहीण असेल (आतेबहिणीशी लग्न हे सर्वमान्य/धर्ममान्य आहे की नाही माहिती नाही. अर्थात अशा वेळी कुणीतरी मुलास किंवा मुलीस दत्तक घेतले तर तिढा सुटतो असे ऐकले आहे.) तर अमितने आशा सोडू नये. प्रयत्न चालू ठेवावेत. लेखकाने गोष्ट त्या दिशेने वाढवावी. जरा इकडे तिकडे हिंडून* शेवटी पियु-अमितचे शुभमंगल लावावे.
* ह्यात पुढील प्रकारची वाक्ये घालावीत.
पियुचे डोळे पाण्याने भरले होते. कातर स्वरात ती म्हणाली "पण कसं शक्य आहे हे अमित? तू विसरलास तरी मी कशी विसरेन ती दिवाळी? तू तिसरीत होतास, मी पहिलीत होते. भाऊबीजेचा दिवस होता. तू जरीची टोपी घालून लाल पाटावर बसला होतास. मी हिरव्या खणाचं परकर पोलकं घातलं होतं. फटाक्यांचे आवाज येत होते, फुलबाज्या तडतड उडत होत्या** आणि मी तुला ओवाळलं होतं.....!"
ह्यामुळे हळव्या वाचकांच्या काळजाला हात घातला जाईल.
** वातावरण निर्मिती लेखकाने आपल्या कुवतीनुसार वाढवायला हरकत नाही.
ह्या गोष्टीला मग "दादा भाई नवरोजी" हे नाव द्यावे.