आदरणीय मिलिंदराव,
मी आपल्या कवितांचा चाहता आहे. सुभषचंद्र, नरेंद्र, प्रवासी व आपण जे काही लिहिता त्याला प्रमाण मानून आम्ही शिकत आहोत.
एक विद्यार्थी म्हणून माझे वरील कविता व चर्चेवरचे मत येथे मांडत आहे.
शाळेत शिकलेले वृत्तालंकार विसरुन गेले आहेत व शिकण्यासाठी येथे परदेशात माझ्यासमोर तरी मनोगत हा एकमेव मार्ग आहे. आम्ही मनोगतवर चर्चीली जाणारी सगळी वृत्ते लिहून शिकत आहोत व आपल्या प्रत्येक कविता कोणत्या वृत्तात बसतात ते पाहने हा आमचा गृहपाठ आसतो.
आपल्या या कवितेला प्रथमतः वाचल्यानंतर मी चांगलाच गडबडलो. काव्यार्थ उमगला नाही. पण वाटले की आपल्या मंदबुद्धीचा प्रकाश असल्याने कदाचित समजला नाही. जर ही कविता इतर कोणाची असती तर मी पण हिंमत करून प्रश्न केले असते.
त्यामुळे प्रवासी म्हणतात त्या वाक्यांना आपण कृपया जबाबदारीच्या भावनेने घ्यावे अशी विंनती.
"नवोदित कवी आदर्श म्हणून आपल्या काव्याकडे पाहतात. ते असे एखादे न जमलेले काव्य पाहून ह्यापुढेही जाऊन अगम्य, कुचके, उर्मट असे काही लिहू लागतील त्याची भीती वाटते म्हणून हा लेखनप्रपंच."
आपण मनोगतचे वैभव आहात. आम्हाला आपला आदर वाटतो व तो वृद्धिंगत व्हावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना.
कृपया स्पष्टोक्तिबद्दल राग मानू नये, लोभ आहेच त्याची वृद्धी व्हावी ही नम्र विनंती.
आपला
(विद्यार्थी) भास्कर
ता.क. - माझ्या यापुढील मनोगतवर येणार्या कविता छंदबद्ध असतील तर त्याचे सगळे श्रेय तुम्हा थोरामोठ्यांनाच आहे.