हिंदी भाषेत नावानंतर जी लावण्याची प्रथा ती भाषा राजभाषा असल्याने किंवा राज्यकारभाराची भाषा असल्याने निर्माण झाली होती, कारण संपूर्ण हिंदी भाषी प्रदेशात बोली भाषा बर्‍याच आहेत आणि स्थानिक ठिकाणी अद्ययापही त्यांचे प्रचलन आहे. त्या भाषा देखील मराठी सारख्या अनौपचारिक आहेत. परंतु‍ मराठी भाषा ही राज्यकारभाराची झाल्यानंतर त्यातील पंत, राव किंवा नंतर नंतर साहेब हे शब्द वर्तमानकाळात सर्व नावांसाठी योग्य ठरत नाहीत. त्यामुळे पुरुष काय किंवा स्त्रिया काय त्यांना औपचारिक व आदरार्थी संबोधन वापरायचे असल्यास जी हा शब्द सोयीचा पडतो. हिंदी भाषेचा प्रभाव हा मुद्दा योग्य असला तरी औपचारिकता पाळण्यासाठी त्याचा उपयोग करण्यास काहीही हरकत नाही.