मूळ संस्कृत शब्द 'परिस्थितिः' जेव्हा मराठीत येतो तेव्हा सर्वसामान्य नियमानुसार त्याचा अपभ्रंश होऊन तो 'परिस्थिती' असा होतो (व्हायला पाहिजे).

त्यामुळे 'परिस्थिती' ऐवजी 'परस्थिती' किंवा 'परीस्थिती' असे म्हणणे हा बोलीभाषेच्या परिणामापेक्षा अशुद्ध उच्चाराचा परिणाम आहे. याचे कारण येथे केवळ उच्चारच बदलत नसून अर्थही बदलतो. परस्थिती मध्ये पर म्हणजे दुसरा वा अन्य, त्यामुळे परस्थिती म्हणजे अन्य कोणाची तरी स्थिती. आणि परीस्थिती मध्ये 'परी' असा उपसर्ग अस्तित्वातच नसल्यामुळे या शब्दाला तसा काहीच अर्थ नाही. (परी म्हणजे पंखवाली परी नव्हे.... हा हा हा.. )

'रयवार' चे उदाहरण म्हणजे बोलीभाषेच्या परिणामामुळे होणाऱ्या अशुद्धतेचे आहे. त्यात मूळ रविवारचा अर्थ बदलत नाही.