मुंबईत येणारे परप्रांतीय पोटापाण्यासाठी येतात.यावर उपाय त्यांना विरोध करणे हा नसुन उद्योगधंद्यांचे विकेंद्रीकरण करणे हा आहे.भारताच्या राज्यघट्नेनुसार प्रत्येक भारतीयाला भारतात कुठेही राहता येते (काश्मिर सोडून).मग आपल्याला असा त्यांना विरोध कसा करता येईल?शेवटी आपण सगळे भारतीय आहोत हे लक्षात घेतले पाहिजे.
आज बेंगलोर,हैद्राबाद मधे आय.टी.उद्योग भरभराटीस आला आहे.भारतातले विविध प्रांतीय तरुण अभियंते तिथे आहेत.म्हणुन तिकडच्या मंडळींनी त्याला विरोध करणे योग्य नाही.जेव्हा प्रत्येक राज्यात असे उद्योगधंदे सुरु होतील तेव्हाच हा प्रश्न संपेल.
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत तात्यांशी सहमत.
मात्र मुंबईतल्या बांग्लादेशीय घुसखोरांवर योग्य ती कारवाई केली पाहीजे.ते "आपले" नाहीत.
-संवादिनी