ह्या क च्या जोडाक्षरांमध्ये क अर्धा व इतर व्यंजने पूर्ण आहेत. म्हणून क+ष = क्ष असला, तरी ष+क  = ष्क असलेले शब्द ह्यात नाहीत, ते ष च्या जोडाक्षरांमध्ये लिहिता येतील. म्हणून ही सदिश जोडाक्षरे आहेत.

क्क = बक्कळ, अक्कल, दुक्कल, नक्कल, शक्कल, टक्कल, चक्का, चक्क, छक्का, धक्का, बुक्का, धक्काबुक्की, फक्की, एक्का, टक्कर, भक्कम, मुक्काम, थक्क

क्त = वक्तशीर, तक्ता, पोक्त, शक्ती, भक्त/भक्ती, युक्ती, उक्ती/द्विरुक्ती, वक्ता, मक्ता, प्राक्तन, सक्ती, आसक्ती, विरक्त, मुक्त, रक्त, रिक्त, अ/सशक्त, फक्त

क्य = अ/शक्य, वाक्य, खाक्या

क्र = अक्रित, क्रय, आ/सं/क्रमण, चक्र/क्री, चक्रम, क्रतु (सप्तषींपैकी एका ऋषीचे नाव), क्रिया, क्रांती, क्रम, अक्राळ-विक्राळ, तक्रार, नक्र, मुक्रर, विक्रम, विक्रांत, विक्रय, विक्री, शक्र, क्रूर, वक्र, तक्र, आक्रमक

क्ल = क्लांत, शुक्ल

क्व = पक्व, क्वचित

क+ष = क्ष = अक्षर, अक्षय्य, अक्ष, ईक्ष, औक्षण, कक्षा, कक्ष, कुक्षी, गवाक्ष, चाणाक्ष, तीक्ष्ण, तितिक्षा, दक्ष, द्राक्ष, दीक्षा, दक्षिण, नक्षलवादी, नक्षा, नक्षी, निक्षून, पक्ष, पाक्षिक, परीक्षित,  बक्षिस, अ/भक्ष/ण, भक्ष्य, मक्षिका, मोक्ष, मीनाक्षी, यक्ष, रक्ष, रक्षा, रक्षण, राक्षस, रुक्ष, अ/परोक्ष, लक्ष, लक्षण, लाक्षणिक, लाक्षागृह, लक्ष्य, वक्ष, वीक्ष्य, विरूपाक्ष, विलक्षण, विचक्षण, स/अ/क्षम, साक्षात, साक्षर, आक्षेप, सुलक्षणा, सोक्ष-मोक्ष, क्षत, क्षर, क्षमा, क्षुधा, क्षुल्लक, क्षेम, शिक्षण, शिक्षा, शिक्षित, वि/क्षिप्त