पोलिस महासंचालक : पी. एस. पसरिचा
अरे हो, पण अनंतचतुर्दशीच्या अगोदर विसर्जनमिरवणुकीच्या मार्गांच्या योजनेबद्दल दूरदर्शनवरून अस्खलित मराठीतून माहिती देताना पसरिचासाहेबांना कधी ऐकलं आहेत का? डोळे मिटून ऐकले, तर बोलणारा सद्गृहस्थ सरदारजी आहे, याचा पत्तासुद्धा लागणार नाही! कदाचित तुमच्याआमच्याहूनही चांगले मराठी बोलत असेल हा गृहस्थ! मग अशा माणसाला परप्रांतीयांत का गणायचे? केवळ नावात 'सिंग' आहे म्हणून???
टगे महोदय, धन्यवाद!
मराठीचा अभिमान फक्त महाराष्ट्रात ज्यांच्या पिढ्यानुपिढ्या गेल्या आहेत त्यांचीच मक्तेदारी आहे काय? जन्मापेक्षा कर्म महत्वाचे. मराठी भाषेचा, महाराष्ट्राचा परंपरेचा आदर राखणारा, त्यांवर प्रेम करणारा तो मराठी. केवळ पूर्वज या मातीत होते म्हणून मराठीतील गमभनही माहीत नसलेल्यांपेक्षा पसरिचा परवडले. त्यांना आपले म्हणायचे की काहीही झाले तरी त्यांना उपरेच ठेवायचे ह्याबाबतची तथाकथित मराठी अस्मितेची मानसिकता काय आहे यावर महाराष्ट्राचे भवितव्य अवलंबून आहे.
सुकृत खांडेकरांनी "मराठी माणसाने जागे व्हायची गरज आहे" ह्या अतिशय योग्य मुद्द्यावर उथळ आणि काहीश्या विकृतपणे लिखाण केलेले आहे.
तसेच सोनकर मूळचे मराठी की अमराठी हा संशोधनविषयही व्यर्थ आहे.