मला वाटते हे सोपे उपाय आहेत. त्यामुळे भलेही त्वरित परिणाम दिसतील पण मूळ प्रवृत्ती (हिंसेविषयी आकर्षण) बदलणार नाही. त्यासाठी विधायक कामांबद्दल आकर्षण निर्माण करणे (म्हणजेच संस्कार करणे) हाच एक योग्य उपाय वाटतो. शिक्षा हा याच प्रक्रियेचा भाग असल्यामुळे अनिवार्य आहेच. म्हणूनच तात्यांशी पूर्णपणे सहमत. शिक्षा कोणी व काय केली यापेक्षा का केली हे समजणे जास्त महत्वाचे आहे. माझ्याही आई-वडिलांनी मला खूप शिक्षा केली पण त्याआधी मला तितकेच समजावलेही.
आणि शिक्षा करणे म्हणजे फक्त मारणे नाही; इतरही अनेक मार्ग आहेत (उदा. अबोला धरणे) जे मोठेपणीही अवलंबता येतात.