अनुप्रिता,

काही मुद्दे मी स्पष्टपणे मांडू इच्छीते. त्याला कृपया अपमानकारक समजू नका.

आपली मुलं टीव्हीवर काय पहातात याची माहिती ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. आजी आजोबांची नाही, त्यांनी आपल्या मुलांना सांभाळल त्यांची जबाबदारी नातवंड नाहीत, तेव्हा आपण कुठे कमी पडतो आहोत ते पहा. ऑफिसमुळे मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसेल तर मग हा नसता ताप डोक्याला लावून घेऊ नका. ती होतील मोठी आणि येईल एक दिवस त्यांना सारासार विचार करण्याची अक्कल. माझं ऑफिसच काम जास्त महत्वाच आहे अस म्हणून गप्प बसा.

अन्यथा,

१. आपली मुलं दिवसातून किती तास टीव्ही बघतात. कोणता कार्यक्रम बघतात. तो त्यांच्यासाठी पूरक आहे का याचा विचार करा आणि माहिती काढा.

२. त्यांच वेळापत्रक ठरवा. त्यापेक्षा जास्त काळ ते टीव्ही पहात असतील तर मारु वगैरे नका. पण त्यांचा रोजचा टीव्ही ही काही काळासाठी बंद करा...किंवा त्यांच्या इतर सुविधांना खीळ घाला.

३. मुलांशी संवाद साधा. म्हणजे,

"आज आजीने वेळेवर जेवण दिलं होतं का?" किंवा

"शेजारच्या सोनुला जास्त गुण कसे पडले" वगैरे नाही.

तर मुलं काय करतात, कसले खेळ खेळतात, टीव्हीवर काय पहातात, त्यांचा आवडता कार्यक्रम कुठला, तो त्यांना का आवडतो, कुठलं पात्र जास्त आवडत ते विचारत जा.

४. मुलांचे कार्यक्रम त्यांच्या सोबत पहात जा. त्यावर आपले मत प्रदर्शित करा. अमुक गोष्ट आवडली नाही तर चांगल्या शब्दांत निषेध नोंदवा. त्याचे कारण द्या. मुलांची मते पक्की नसतात, त्यांचा आपल्या मतप्रदर्शनावर चटकन विश्वास बसतो.

५. टीव्ही व्यतिरिक्त दुसऱ्या कार्यक्रम किंवा उपक्रमांची त्यांना गोडी लावा.

तेव्हा हा प्रयोग करुन पहायला हरकत नाही.