तात्या, कोंबडी, फुलराणी, कुशाग्र, महेश, एकलव्य सर्वांच्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे. या हिंसक खेळापासून माझ्या लेकराला वाचवण्याचे मी केलेले उपाय म्हणजे

1 त्याला आजपासून एका कार्यशाळेत घातले आहे.

2 घरी सरावासाठी काही अभ्यास दिला आहे, जो मी परत येई पर्यंत करायचा आहे.

3 कंटाळा आल्यास वाचण्यासाठी काही मराठी पुस्तकं आणि चित्रकथा आणून दिल्या आहेत.

4 चित्र रंगवण्यासाठी भरपूर रंग आणि पुस्तकं आणली आहेत (एक्टीव्हिटी बुक्स)

5 पत्ते आणि लहान मोठ्या जादू करण्यासाठी सामान आणलं आहे. ज्यातलं काही तरी आम्ही रोज त्याला शिकवतो आणि सराव करायला सांगतो.

6 संगणकावर खेळण्यासाठी काही तबकड्‍या आणि काही शैक्षणिक माहीतीपर खेळ असलेल्या तबकड्‍या आणल्या आहेत ज्यात त्याला भरपूर रस आहे.

7 आजी आजोबांना मदत म्हणून झाडांना पाणी घालणे, जेवण्यासाठी ताटं आणणे वगैरे लहान मोठी घरगुती कामं करायला सांगितली आहेत.

8 टिव्ही पहाण्याची वेळ ठरवून दिली आहे आणि त्यापेक्षा जास्तवेळ टिव्ही पाहिल्यास ती वाहिनी हटवण्याची धमकी दिली आहे.

9 काही नवीन खेळणी देखील आणली आहेत. शिवाय 4/5 तासांनी आम्ही घरी फोन करून त्याच्याशी बोलतो आणि कंटाळा तर आला नाही ना याची खात्री करतो. आला असेल तर काही तरी नवीन करण्याची कल्पना सुचवतो.

आपल्याला आ‍णखी काही उपाय सुचल्यास अवश्य कळवा.