मुंबईत मराठी भाषिक लोक २२ ते २३ टक्केच आहेत असे गेल्या वर्षीच्या निवडणूकविषयक कार्यक्रमात ऐकले होते (मटावालेही शहानिशा केल्याशिवाय आकडेवारी देणार नाहीत असे वाटते) शिवाय बहुतेक मतदारसंघात मराठी भाषिक अल्पसंख्य होते. त्यामुळेच मराठी उमेदवार विरूद्ध अमराठी उमेदवार लढतीत बहुतेक अमराठी उमेदवार विजयी झाले. जिथे मराठी उमेदवार विरूद्ध मराठी उमेदवार होते तिथे परप्रांतीयांना अनुकूल असलेल्या पक्षाचे उमेदवार विजयी झाले.

चूभूद्याघ्या. माहितगारांनी अधिक/योग्य माहिती द्यावी.