परक्यांना रायगडाच्या वाटा कुणी दाखवल्या? एका मराठी माणसाने!
महाराष्ट्रातील एकेकाळी बहुमताने मंत्री/ आमदार/ नगरसेवक वगरे मराठी असताना परप्रांतियांची भरभराट कुणी केली? मराठी माणसाने!
मराठी मनुष्य हा प्रत्येक भारतियाप्रमाणे अत्यंत परधार्जिणा आहे. नको तिथे अभिमान आणि जीथे अभिमान धरावा तिथे लाचारी. मामलेदार मध्ये मिसळ मागवताना जर लोक दो मिसल लेना म्हणतील तर परप्रांतियांचा काय दोष? दोन मराठी मुले सर्रास एकमेकाला क्या यार किधर है तू असे म्हणतात ते काय भैयांच्या वा बिहारींच्या दबावाने की प्रभावाने? दोन्हीमुळे नाही तर ते स्वाभिमानाच्या अभावाने. आपले ते हीन परक्याचे ते भले ही आपली मनोवृत्ती.
परका तो बरोबर आणि त्याची बाजू घेउन आमचेच लोक आमच्याशीच भांडणार! अगदी साधे उदाहरण घ्या. मराठी दूरदर्शन वर अन्य भाषिय कार्यक्रम का? असा खडा सवाल केला तर समर्थन करायला सर्वप्रथम मराठी माणुसच पुढे येइल. सहिष्णुता, राष्ट्रिय एकता, माणुसकी वगरेचा पुळका येउन मराठी माणसांनी अमराठीला केलेला विरोध कसा गैर हे सांगणारे आमचे मराठी लोक कसे चुकतात हे जगाला सांगणारे मराठीच !
मग तक्रार कशाची?