अनुप्रिता,

तुम्ही सुचवलेले उपाय योग्य आहेत. पण,

१. मुलांना नव्याची नवलाई नऊ दिवसही नसते. (हल्ली मोठ्यांनाही नसते) तेव्हा रंग, पुस्तकं, संगणकावर खेळण्यासाठी काही तबकड्‍या वगैरे त्यांच्या हाती देऊन काहीही साधणार नाही. त्यापेक्षा तुम्ही स्वतः त्याच्या बरोबर बसा. त्याच्या जोडीने चित्र रंगवा. संगणकावर खेळ खेळा.

२. मुलं आई वडिलांच्या सोबतीची भुकेली असतात. त्यांना घेऊन संध्याकाळी पार्क मधे जा. (मॉल मधे नको) बरोबर बैठे खेळ खेळा. तुम्ही सांगितलेले सर्व उपाय हे सुखी घराची दुखणी आहेत. प्रत्येकाच्या घरात थोड्याफार फरकाने हेच चालते.

३. टीव्ही पहाण्यासाठी कष्ट पडत नाहीत. तोंड आणि डोळे वासायचे एवढे काय ते कष्ट. तेव्हा मुलांना सुविधा उपलब्ध केल्या तर ते टीव्ही बघायचे सोडून देतील ही व्यर्थ आशा आहे. स्वानुभावावरुन सांगते. तेव्हा आपला वेळ त्यांच्याबरोबर घालवणे व त्यांच्या मनात रस उत्पन्न करणे केवळ तुमच्या हाती आहे. त्यांना टीव्ही बंद करण्याची धमकी देऊ नका सरळ करुन दाखवा.

४. हा सर्वात महत्वाचा मुद्दा. टीव्ही पाहून आजकाल सर्वांचीच मनं मेलेली आहेत, म्हणजे एखादा खरा अपघात वगैरे पाहूनही आपण हळहळत नाही. तरीही दुसऱ्याला रक्त येईपर्यंत मारणे हे नॉर्मल मनाचे लक्षण नाही. अशा मुलांना समुपदेशनाची गरज आहे. याला आपल्या देशांत अजूनही हेटाळले जाते. अमेरिकेची समृद्धी घेतली तर त्या बरोबर त्यांची दुखणीही फुकट मिळातात. तेव्हा अशा मुलांबरोबर आपल्या पाल्याला मिसळू देऊ नका. आज फक्त मारामारी आहे उद्या त्यापुढे जायलाही ही मुले कमी पडणार नाहीत. तेव्हा वेळीच उपाय योजा.

फुलराणी