मला वाटतय की आपण म्हणता ती गफलत नाही. मुलांना अक्कल नसते अस कोणिच म्हंटलेलं नाही. म्हंटलेल असल्यास तो विनोद नाहीतर अतिशयोक्ती समजावी. संस्कार करण्यात काही वावगं आहे का? टीव्ही पाहूनही त्यांच्यावर एक प्रकारे संस्कारच होत असतात.

शहाणपण हे अनुभवाने येते, आणि मोठ्यांना अनुभव अधिक असतो. त्यामुळे मुलं इतकी शहाणी आहेत की त्यांना त्यांचे निर्णय घ्यायला द्या असे म्हणणे बरोबर नाही.

आता तुमचे मुद्दे इतरांपेक्षा फार वेगळे नाहीत.

एक टिव्हीचा मुद्दा फार गंमतीशीर आहे. प्रमाणात कुठलीही गोष्ट करणे उचित असते. तेव्हा टिव्ही बिघडवणे हा अघोरी उपाय झाला, कारण त्यावर अनेक चांगले कार्यक्रमही येतात.

मधुमेह्याच्या रोग्यालाही डॉक्टर अधुनमधुन गोड खायची परवानगी देतातचकी. 

एकंदरीत मुद्दा टिव्हीचा असल्याने आमच्या लहानपणीची आत्ताशी तुलना करणे कठिण आहे. त्यावेळी असे कार्यक्रम अभावानेच होते.