मावळे ज्याप्रमाणे शत्रूच्या तोफांच्या बत्तीच्या छीद्रात खिळे ठोकून त्या बंद पाडीत, त्या प्रमाणे टीवी बंद पाडणे किंवा कमीत कमी रिमोट लपवणे यासारख्या गनिमी काव्यांचा मोह होणे स्वाभाविक आहे ;-)

कुटुंबात सर्वानुमते एक दिवस ठरवून त्या दिवशी कडकडीत टीवी उपास करता येतोय का ते बघा. त्यादिवशी मग आपापलं पण एकत्र वाचन ... हात वाळेपर्यंत जेवणाच्या टेबलावर गप्पा ... व्यापार/मोनॉपॉली ...