सहिष्णुता, राष्ट्रिय एकता, माणुसकी वगरेचा पुळका येउन मराठी माणसांनी अमराठीला केलेला विरोध कसा गैर हे सांगणारे आमचे मराठी लोक कसे चुकतात हे जगाला सांगणारे मराठीच !
सर्वसाक्षी
तुम्ही मला एका प्रश्नाचे उत्तर द्याल का?
आज बेंगलोर,हैद्राबाद येथे सॉफ़्ट्वेअरचा उद्योग भरभराटीला आला आहे.तिथे सगळ्या राज्यांतील अभियंते आहेत.तेव्हा कर्नाटकी,तेलगू मंडळींनी त्याला विरोध करावा का?
भारतात उद्योगधंदे काही ठिकाणीच एकवटले आहेत.त्यामुळे रोजगाराच्या संधीही तिथेच उपलब्ध आहेत. हे चित्र जेव्हा बदलेल तेव्हाच हा प्रश्न सुटणार आहे.उद्या संपुर्ण भारत विकसित झाला तर आमची मराठी मंडळीही जातील की रायबरेलीत.
बाकी मराठी माणस महाराष्ट्रात असुनही व्यवहारात हिंदीचा वापर जास्त करतात या तुमच्या मताशी पुर्णपणे सहमत.
-संवादिनी