वा वरदाताई,
मनोगताच्या प्रतिष्ठित व्यासपीठावर आपल्यासारख्या उभयशाखाविदुषीचे आगमन व्हावे हे आम्हा मनोगतींना लाभलेले अलौकिक 'वरदा'नच आहे जणु! आपल्या येथील वावरासाठी हार्दिक शुभेच्छा.
आपला
(शुभेच्छुक) प्रवासी
अत्यंत सुंदर अनुभवकथन! संस्कृत साहित्यात फेरफटका मारायला मिळणे ही सुखाची पर्वणीच जणु!
आपला
(सुखलोलुप) प्रवासी
दुधाने भरलेल्या गायी, गायींनी भरलेला चबुतरा, चबुतर्याकडे येणार्या राजाचे मिलनोत्सुक आकांक्षांनी भरलेले मन आणि भान हरपिलेल्या राजाला रोजचीच वाट इथे इथे म्हणून दाखविण्यास उपलब्ध समयसूचक प्रतिहारी हे सारे भासाच्या नाटकाचे वैभव आहे असे वाटते. आणि ह्या गोष्टींचे वक्रोक्तीतून होणारे सूचक वर्णन हे साहित्याचे सौंदर्य आहे. शेकडो वर्षांपूर्वी काश्मिरात होऊन गेलेले कल्हण का कोणीतरी संस्कृत पंडित असे काहीसे म्हणतात म्हणे - "सामान्यातील सामान्यास देखील विज्ञान शिकणे सहज शक्य आहे. परंतु साहित्याच्या क्षेत्रात पाय ठेवण्यास देखील प्रतिभा आवश्यक आहे."
आपला
(साहित्यप्रेमी) प्रवासी
पाय मोडण्यासाठी हलन्तचा ह (टिंब एच्) वापरा. पाय मोडा पण कोणाचे मन मोडू नका म्हणजे मिळवले.
आपला
(आगाऊ) प्रवासी
मद्य जितके जुने तितकी त्याची गुणवत्ता अधिक असे म्हणतात. तेव्हा अशीच आपण आपल्या जुन्या जुन्या आठवणींच्या मद्याची चूळ इथे भरलीत तर मनोगतावरील ह्या अशोकवृक्षाला आजच्यासारखी सुरेख फुले नियमितपणे आल्याशिवाय राहणार नाहीत असा आम्हाला भरवसा वाटतो.
आपला
(निश्चिंत) प्रवासी