जेव्हा आपल्या ईग्रजांचा आपल्या सैन्यावरचा विश्वास उडाला, जेव्हा आपले हत्यार कधीही आपल्यावर उगारले जाण्याची दहशत इंग्रजांच्यात निर्माण झाली, जेव्हा देशाबाहेर राहून देशातल्या प्रस्थापीत नेत्यांचा पाठींबा सोडाच पण प्रखर विरोध असतानाही जेव्हा आझाद हिंद सेनेला भारतिय सेनेचा दर्जा मिळाला, जेव्हा नेताजींना नउ देशांनी राष्ट्रप्रमुखाचा मान देउ केला, जेव्हा हिटलर सारख्या हरामखोर माणसाने एका देश सोडून आलेल्या भारतियाच्या शब्दाखातर आपलाच पसारा डामाडोल असतानाही सर्वतोपरी मदत देउन भारतिय सेना उभारण्यात बिनशर्त मदत दिली, नेताजींना स्वतःच्या खर्चाने आणि जोखमीने अर्धे जग ओलांडून पूर्वेला सुखरूप नेउन पोचवीले, जेव्हा जपानसारख्या देशाने आपली सेना, पैसा व शस्त्रे केवळ एका नेताजिंच्या खातर बासनात गुंडाळलेल्या मोहीमेवर रूजु केली , जेव्हा जॅप्स आणि जिप्स (जॅपनिज इन्स्पायर्ड फिफ्थ कॉलम्निस्ट ) असे आझाद हिंद सेनेला हिणवणाऱ्या डिक्कीला आपले मुखयालय पार दुसऱ्या टोकाला लंकेत बसवावे लागले, जेव्हा अंदमान - निकोबार हातातून गेले, जेव्हा ब्रिटन-अमेरिका संयुक्त सेनांच्या तोंडाला इशान्येत फेस आला, जेव्हा इशान्येच्या भूमित इंग्रज सैन्य हतबल झाले, जेव्हा तथाकथित अभेद्य इंग्रजी साम्राज्याच्या हातून सिंगापूर क्षणात हिसकले गेले, जेव्हा सामान्यातला सामान्य माणूस आझाद हिंद च्या पराभूत वीरांना भेटायला रस्त्यावर उतरला आणि कुठल्याही नेत्याच्या सभेला जमला नसेल असा जनसागर त्यांचा जयजयकार करायला जमला, जेव्हा आझाद हिंदच्या वीरांनी अभियोगाच्या प्रत्युत्तरात आपण आपल्या देशाचे मीठ खाल्ले आहे, तुमच्या राजाचे नव्हे असे ठणकावून सांगीतले, जेव्हा ईंग्रज सैन्याधिकारी सेना सांभाळायला असमर्थ ठरल्याचे व त्यांनी आपले लष्कर खुशाल शत्रूच्या स्वाधीन केल्याने त्यांची त्या लष्करावर कसलीही हुकुमत नसून त्या सेनेने शत्रूचाच हुकुम मानणे हे युद्धनितीला अनुसरूनच असल्याचे सिद्ध झाले....
......तेव्हा धूर्त ईंग्रज समजून चुकले की आता आपले दिवस भरले आहेत.
प्रत्यक्ष तिरंगा जरी १५ ऑगस्ट १९४७ ला फडकला तरी युनियन जॅकच्या हिंदुस्थानातील अंत्यसंस्काराची तयारी ४५ सालीच सुरू झाली होती हे सत्य आहे.
ईंग्रज नुसत्या घोषणा ऐकुन गेले हा एक पद्धतशिर पणे गोबेली प्रचारतंत्राने जनतेच्या गळी उतरवलेला गोड गैरसमज आहे.