मला वाटते साबूदाणा हा मूळचा (कोलंबसाच्या) 'नव्या जगा'तला प्रकार सर्वप्रथम पोर्तुगीजांबरोबर हिंदुस्थानात आला. उपवासाचे नियम आणि वर्ज्य पदार्थांची यादी ही बहुधा त्यापूर्वी निर्माण झालेली असावी, आणि त्यामुळेच साबूदाणा हा वर्ज्य पदार्थांच्या यादीत उल्लेखला न गेल्याने आपण उपासाला चालवून घेतला असावा. (बटाट्याचेही काहीसे असेच असावे. किंबहुना बटाटा हा शब्द आपण पोर्तुगीज भाषेतून घेतला आहे.)
पण मग चहा, पाव, तंबाखू हेही बाहेरूनच आले की! म्हणजे तेही चालतात की काय? (चहा चालतो असे वाटते; पाव, तंबाखूबद्दल माहीत नाही.)
- टग्या.
अवांतर: उपासाचे नियम बनवताना 'काहीही खाऊ नका' हे कदाचित लोकांच्या 'पचनी' पडणार नाही, म्हणून तत्कालीन माहीत असलेल्या सर्व खाद्यपदार्थांची यादी करून 'हे वर्ज्य', असा प्रकार झाला असावा का? तज्ज्ञांनी खुलासा करावा!
- टग्या.