<<सर्वसाक्षी
तुम्ही मला एका प्रश्नाचे उत्तर द्याल का?
आज बेंगलोर,हैद्राबाद येथे सॉफ़्ट्वेअरचा उद्योग भरभराटीला आला आहे.तिथे सगळ्या राज्यांतील अभियंते आहेत.तेव्हा कर्नाटकी,तेलगू मंडळींनी त्याला विरोध करावा का?>>
संवादिनी,
होय, अवश्य करावा, परंतु तो विरोध तेव्हा आणि तरच करावा जेव्हा आणि जर...
१) बाहेरची मंडळी अनधिकृत बांधकामे करू लागली
२) बाहेरची मंडळी संघटित होउन स्थानिक लोकांना दादागिरी करू लागली
३) बाहेरची मंडळी सर्व नियम धाब्यावर बसवून खोट्या शिधापत्रिका मिळवू लागली, बेकायदा वसाहती स्थपन करून त्याला राजकिय अभय मिळवू लागली
४) बाहेरच्या लोकांची मुले बाळे वसतिगृहात स्थानिकांच्या मुलांना संघटितरित्या मारहाण करू लागली
५) बाहेरची लोक ५-७ हजारांसाठी सुपाऱ्या घेउ लागली
मला वाटते की आपण ज्या स्तराचा उल्लेख करित आहात त्या स्तरातील 'इतर राज्यातील' माणसे कुठेही गेली तरी वरील पैकी काहीच करीत नाहीत आणि करणारही नाहीत.
जो पर्यंत परप्रांतिय वरील उद्योग करीत नव्हते, तोपर्यंत असा कडाडून विरोध परप्रांतियांना महाराष्ट्रातही कधीही झाला नव्हता. कर्नाट्क व गुजरात या राज्यांमध्ये चाचा नेहेरू-कृपेने मराठी द्वेष निर्माण झाला व त्या दोन राज्यातून आलेल्यांना काही काळ त्याचा परिणाम म्हणून काही काळ तात्कालिक उद्रेकापोटी विरोध झाला. अन्यथा जो तो आपल्या गुणावर येतो, नोकरी मिळवतो व सुखाने जगतो असे मानून कुणालाही या महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांनी विरोध केला नव्हता.
उत्तर देण्यास झालेल्या विलंबाबद्दल क्षमस्व, नाइलाज होता. काय करणार हो? हल्ली फार काम असतेः) कधी कधी तेही करावे लागते.
असो. कलोआ.