तुम्ही म्हणता तसे  अद्यावत आणि अद्ययावत ह्या दोन शब्दांचा स्थित्यंतरे दाखविण्यासाठी चांगला उपयोग करता येईल.

पण अद्यावत हा भाषाशास्त्रीयदृष्ट्या चुकीचा शब्द आहे, असे मला काही तज्ज्ञांनी सांगितले. आता तो भाषेत रुळला आहे, रूढ झाला आहे. त्यामुळे वापरला तर हरकत नाही. तरीही पहिली पसंद ही अद्ययावतला हवी. ह्या आवत च्या मुळाशी जावे लागेल.

अद्ययावत आणि अद्यावत माहिती उद्या परवापर्यंत मिळेलसे वाटते.

चित्तरंजन