स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद. अद्ययावत बरोबर की अद्यावत हा प्रश्न पडण्याचे कारण असे की अद्यावत हा शब्द केवळ मनोगतावरच वापरलेला दिसतो. इतर कोठेही हा शब्द वाचनात आल्याचे स्मरत नाही. अनेकदा काही चुकीचे शब्द अनवधानाने योग्य समजून वापरले जातात. त्यापैकीच अद्ययावत हा एक शब्द आहे की काय अशी शंका अद्यावत हा शब्द वाचताना आली. मात्र तसे नाही, हे वाचून बरे वाटले.