कुणीही अनधिकृत पणे बांधकामे करणे, दादागिरी करणे, खोट्या शिधापत्रिका मिळवणे,मारहाणी करणे, सुपाऱ्या घेणे गुन्हे असल्याने पण हे सारे करण्यात मराठी माणूस मागे असून (इतर पुढे आहेत हे पाहता) अशा साऱ्यांकडून लाच घेण्यापुरता मराठी माणूस पुढे आहे की काय? याचाच अर्थ भ्रष्ट प्रवृत्ती मराठी मानसांतही आहेत पण हिंमत नाही असा होतो? की लाचच पुरे ही अल्पसंतुष्ट वृत्ती या मागे आहे?

हे कसे रोखावे?

मराठी माणसाने हे टाळायसाठी काय करायला हवे? (संघटित व्हा, मारामारी करा हा तात्पुरता उपाय काही काळ शिवसेनेन यशस्वी ही केला आज परिस्थिती काय आहे?)

हे टाळायचे वैध मार्ग काय असू शकतील?

मुंबई पोलिसांनी त्याचे काम केले तरी पुरेसे नाही काय? ते तसे करत नाहीत काय? यामागील कारणे काय असावीत? उपाय काय असू शकतील?