श्रीयुत वेलणकर,

अद्यावत हा सद्यस्थितीत वापरात नसलेला शब्द सांगून तुम्ही सद्यस्थितीतील मराठीत मोलाची भर घातली आहे.

आवत् ह्या संस्कृत स्त्रीलिंगी नामाचा अर्थ 'जवळीक' असा होतो असे वाटते. वर्तमानाशी जवळीक अशा अर्थाने अद्य + आवत् = अद्यावत् (म्हणजे मराठीत अद्याव) हा शब्द वापरणे योग्य वाटते.

अव् १उ.प. ह्याचे कर्मणि भूतकालवाचक धातुसाधित विशेषण अवित किंवा ऊत होते असे वाटते. 
अवांतर - परस्मैपदात अव् चे अवतु असे रूप होते. ॐ सहनाववतु = सह नौ अवतु (आम्हा दोघांचे म्हणजे गुरू आणि शिष्याचे रक्षण करो) इत्यादी.