वरदा, आदिति, प्रवासी, महेश, प्रशासक आदी,
संस्कृत आणि सुभाषिते या दोन्ही माझ्या आवडीच्या गोष्टींमध्ये इतल्या खूप कोकांना अधिक गति आहे हे पाहून खूप आनंद झाला.
नोव्हेंबर महिनाअखेरी मी एक सुभाषित दिले होते. त्याचे सर्व शब्द मला माहित नव्हते. साधारण ८०% शब्द आठवत होते. ते इथले मननीय सभासद पूर्ण करू शकतील का?
निःस्वो वष्टि शतम् शती दशशतम् लक्षम् सहस्त्राधिपो ॥
...........
ब्रह्मा विष्णुपदम् हरि शिवपदम् अशा वधिं को गता ॥
या सुभाषिताचे सर्व शब्द आणि शुद्धलेखनाची तपासणी करून इथे प्रस्तुत कराल का?
(आगाऊ आभारी) सुभाष
ता.क. थँक्स इन ऍढवान्स चे भाषांतर आहे आगाऊपणा नाही, तर नम्रता आहे याची सभासद नोंद घेतीलच. सु.