यावत् अव्यय(इनडिक्लाइनेबल) आहेसे कळते. यावत् तैलम् तावद् आख्यानम् असे माझी आजी नेहमी म्हणायची :)शिक्षकांनी नमूद केलेले आवत्  हे स्त्रीलिंगी नाम अस्तित्वात आहे की नाही हे मोलिए-विल्यम्ज़ मध्ये बघावे लागले. पण तज्ज्ञांनी नाही, असे सांगितले.

आवत् हे स्त्रीलिंगी नाम किंवा अव्यय अस्तित्वात नसल्यास अद्यावत हा शब्द चुकीचा आहे असे म्हणावे लागेल.

अभ्यास सुरू आहे. ऋग्वेदातले आवत् चे दाखले इथे  देवनागरीत बघावेत.

 चित्तरंजन