संप्रदायिक भजनांमध्ये म्हटले जाणारे एकनाथांचे एक पद असेच आहे, आठवेल तसे, आठवेल तितके देत आहे (माहितगारांनी अचूक रचना, असल्यास, द्यावी)
चिंचेच्या पानावर देऊळ रचियले
आधी कळस मग पाया रे
देवपूजे गेलो तव देऊळ बुडाले
परियेसी सद्गुरू राया रे
दोमुखी हरिणी पाण्यावर आली
मुखावीण पाणी प्याली रे
आंधळ्याने पाहिले बहिऱ्याने ऐकिले
पांगळ्याने पाठलाग केला रे
एका जनार्दनी एकपण विनवी
अखंड रामनाम स्मरा रे
याशिवाय "वांझेचा पुत्र पोहला रे" असा शेवट असलेले एक कडवे आता आठवत नही.