खूपच पोटातला विषय निवडला त्याबद्दल अभिनंदन! मला उपासाचे जे rules आहेत त्याची भारी गंमत वाटते. उदा. शेंगदाणे चालतात पण तेल चालत नाही, लाल भोपळा चालतो दुधी भोपळा चालत नाही. पौषात तीळ चालतात एरवी चालत नाही  अशी अनेक उदाहरणे देता येतील. कर्नाटकात दूध पोहे खातात. ह्याचा अर्थ आपल्या सोयीनुसार, आवडीनुसार प्रांतानुसार काळानुरूप आरोग्याशास्त्रानुसार असे बदल होत गेले असावे. आयुर्वेदानुसार एक दिवस पोटाला complete आराम म्हणून उपास. मनावर तसेच तोंडावर ताबा म्हणून उपास . पण मी खरं सांगू change in food म्हणून माझा उपास. मी कुठेतरी वाचलं की राजगिरा अतिशय कल्शियमयुक्त असल्यामुळे अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर राजगिऱ्याची लागवड होतेय. एक दिवस फक्त राजगिरा खाऊन उपास करायला हरकत नाही. मलाही कोड आहे आपल्या इथे उगवत नाही मग उपासाला कस काय  साबुदाणा व बटाटा  चालतो. ज्या कुठल्या देशातून आपल्या देशात ह्या दोन जिन्नस आणले त्या ते मार्केटिंग वाल्यांची स्कील खूपच जोरदार म्हणावी लागेल.  ते काहीही असू देत आपल्याला कधीही साबुदाणा खिचडी चालते.