शिक्षक महाशय,
तुम्ही सुचविलेला उपाय कितीही चांगला असला तरी तो इथे मांडायचे पाप केल्यामुळे बोंबा सुरू झाल्या नाही म्हणजे मिळवले. माझ्या घरच्या मुलांमध्ये शाखेत जाऊ लागल्या पासून हे बदल घडले आहेत...
१. त्यांच्या कामात टापटीप आली आहे. स्वतःची पादत्राणे, कपडे, खेळणी, पुस्तके वगैरे जागच्या जागी व्यवस्थित ठेवले जातात.
२. शाखेतल्या खेळांमुळे, सूर्य नमस्कारांमुळे दणकावून जेवतात. अगोदर बाब्या जेव म्हणून आया २-२ घंटे त्यांच्या पाठीशी असायच्या.
३. त्यांना सणांचे महत्त्व कळू लागले आहे. नाहीतर अगोदर दसऱ्याला फटाके नसतात म्हणून दिवाळीचेच महत्त्व असे. दसरा त्यांच्या गिनतीतही नव्हता.
४. घरी मुले फार चांगले वागत आहेत. संध्याकाळी शुभंकरोती म्हणणे, वडिलधाऱ्यांना नमस्कार करणे, दररोज पर्वाच्या म्हणणे, मॅकडोनाल्डमध्ये खायचा हट्ट न धरणे अशा छोट्या-छोट्या गोष्टींनी मन कितीतरी सुखावून जाते.
असो. आता बस करतो नाहीतर पुन्हा कोणीतरी म्हणायचे की तरूण भारतातला लेख वाटतो म्हणून!
आपला,
(शाखाप्रेमी) बाळू