हे असले प्रकार आपल्या पुण्यात घडतात हे धक्कादायक.. त्याहून दिवसाढवळ्या लोकांच्या नजरेसमोर घडतात हे जास्त धक्कादायक आणि लोक/पोलिस काही करत नाहीत हे जबरी धक्कादायक आहे..
तात्या, माणूस आरडा-ओरडा, आवाज चढवणे हे प्रकार करतो आजूबाजूच्या लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी. इथे तर लक्ष असूनही कुणी मदतीला येत नाही, मग ह्या सगळ्याचा उपयोग होईल का? चोर अगदीच भुरटा असेल तर घाबरेलही. पण अट्टल गुन्हेगारासमोर ह्याचा उपयोग होईलसे वाटत नाही.
मला वाटतं आपण जवळ pepper spray किंवा stun gun बाळगणे बरे. एकदम ५-६ लोक आले हल्ला करायला तर त्याचा कितीसा उपयोग होईल माहित नाही, पण निदान ३-४ जणांना काही वेळापुरतं का होईना थोपवायला ह्या गोष्टींचा उपयोग होईल मला वाटतं.