हे सगळे भयानक चालू आहे !! पुण्यामधे असले प्रकार चालू आहेत ? कठीण आहे. पौड रस्त्यासारख्या ठिकाणी असे घडू शकते म्हणजे हद्दच झाली .. म्हणजे इतके दिवस पुण्यात रात्री उशीरापर्यंत फिरणेही सुरक्षित वाटायचे ते हळूहळू बदलायला लागले आहेत तर... पण काय हो या वरच्या सगळ्या घटनांमधे ते लोक मराठीभाषिक होते की परभाषिक ?
तात्या तुम्ही वरचढ आवाज वगैरे म्हणालात ठीक आहे पण अशी परिस्थिती ज्याच्यावर ओढवते तो गोंधळून, घाबरून गेलेला असताना आवाज तरी फुटायला हवा ना ?? त्यातून एखादी मुलगी/बाई असती तर ?? आज सूर्यमहाशयांना ओढत रिक्षात घालून घेऊन जात होते उद्या एखाद्या मुलीला नेतील पळवून ?
हे सगळं खरंच भयंकर चालू आहे.