उन्हाळे पाहिलेत असे म्हणतात का? माझ्या ऐकिवात तरी केवळ इतके पावसाळे पाहिलेत असे आले आहे. (चू. भू. द्या. घ्या.) संवादिनी यांनी सांगितलेल्या कारणाव्यतिरिक्त अजून एक कारण असे असू शकेल की, केवळ पावसाळाच हा असा ऋतू आहे जो आपण दृष्य स्वरूपात पाहू शकतो. दुसरे कारण, म्हणजे पारंपारिक दृष्ट्या आपले सारे वर्ष पावसाळा कसे जाईल यावर अवलंबून असते (शेती, पिण्याचे पाणी इ.) तेव्हा सर्वात महत्त्वाचा ऋतू म्हणून पावसाळा हे कुठल्याही वर्षाबद्दल बोलताना ध्यानात घ्यायचे परिमाण झाले असावे आणि त्यावरून वरील वाक्यविशेष जन्माला आला असावा. असो, हा केवळ माझा अंदाज. माझ्याहून अधिक 'पावसाळे' पाहिलेली मंडळी कदाचित यावर अधिक माहिती देऊ शकतील.