माझ्या मांसाहाराविषयीच्या अगाध अज्ञानामुळे, लेखाच्या नावावरून 'आंब्या नावाचा कोकणी माणूस (कोकणातील गड्यांची अशी नावे असतात असे ऐकीवात असल्याने) आणि कालवी नावाची गाय/म्हैस' यांच्यावर लेख आहे असे वाटले होते. त्यातले आंब्या हे 'व्यक्तीचे नाव' तरी निदान बरोबर निघाले. पण 'आवडती कालवी हॉटेलात मिळायला लागली' असे वाचल्यावर गडबडायला झाले ! मग पूर्वग्रह बाजूला सारून लेख वाचला ः-) आणि आवडला. कोंकणाचे वर्णन सुरेख !