का कवी (पुस्तकात मोरपिसे वगैरे घालून) अभ्यासाच्या (अर्थात विद्येच्या... म्हणजे सरस्वतीच्या हो, ऍज इन सरस्वती देवी!) प्रेमात पडला आहे, असा काही अर्थ अभिप्रेत आहे???
नाही! कदापी नाही!!
विभास अभ्यास सोडून पुस्तकातले ते मोरपीस डोळे बंद करून स्वत:च्याच गालावरून फिरवत फिरवत प्रेमकविता पुटपुटतो आहे, असेदेखील मला सुचवायचे नाही.
सरस्वती प्रेमाच्या मामल्यात काही करू शकत नाही, हे खरे. सारस्वत म्हणून नव्हे तर एक विनम्र काव्यवाचक म्हणून माझी प्रार्थना कवी आणि त्याच्या कवितेप्रीत्यर्थ आहे.