सुखदासान,
वर्णन खूपच सुंदर झालंय. छायाचित्रं तर केवळ अप्रतिम आहेत. पर्यटक म्हणून जपानला जायचंच या निश्चयात भर पडली आहे.
गोरुदेन वुईक हे गोल्डन वीक या इंग्रजी शब्दाचे जपानी उच्चारण आहे. जपानी शिकत असताना कामाकुआचा धडा अनेक वेळा वाचला होता आणि त्याचं जपानीतून इंग्रजी आणि इंग्रजीतून जपानी असंदोन्ही पद्धतीने भाषांतरही केलं होतं.त्यामुळे कामाकुरा आणि तिथला दाईबुत्सु पाहून अनेक सुंदर आठवणी जाग्या झाल्या. दांगो वाचून तर तोंडाला पाणी सुटलं. "कुशीनी सासात्ते दांगो" अर्थात सळईला अडकवलेल्या ३ दांगो गोळ्यांचं एक अत्यंत लोकप्रिय बालगीत आहे. तुला ऐकायची संधी मिळाली तर नक्की ऐक. ते ऐकल्यापासून दांगो खाण्याची इच्छा आहे. पाहूया कधी जमतेय ते.
किरेई ना श्याशिन ओ मिसेते कुरेतानोदे होन्तोनी ओमोशिरोकु नात्ता ने! ज्या दोऽमो अरिगातोऽगोझाईमाशिता..
(अर्थः सुंदर छायाचित्र पाहून खूप छान वाटलं त्याबद्दल धन्यवाद!)
--अदिती