मंडळी, एव्हढा लांबलचक लेख वाचल्याबद्द आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
चित्तराव लेख १-२ भागात लिहायचा विचार केला होता पण एका भागात नुसतेच वर्णन आणि एका भागात चित्रे जास्त असे विषम प्रमाण होत नसल्याने तसे केले नाही.
हा वुइक्कू वीकपासून तयार झाला असावा. तेलुगू भाषेचा प्रभाव दिसतो आहे.:)
जपानीत आ इ उ ए ओ एव्हढेच स्वर असल्याने तसेच 'v' व्यंजनामधे फक्त 'वा आणि ओ (वो)' असल्याने वीक चा उच्चार वुइक्कु असा केला जातो. जपानीत 'वु' नसल्याने लिहिताना मात्र उइऽकु असे लिहिले जाते.
वात्रटराव, चित्रांची लिंक द्यायला हवी होती खरी. लक्षात नाही आले.
अदिती, धन्यवाद. 'दांगो सान क्योऽदाइ' तोंडपाठ आहे गं. साधरण ६ वर्षापूर्वी रानडेत कांगेईकाई मधे मीही म्हटले होते.