चीनची काही कल्पना नाही. पण जपानमधे माझे तरी हाल झाले नाहीत अजून. इथे खूप, महागडी असली तरी, भारतीय रेस्टॉरंट असतात(चालविणारे बऱ्याच वेळी नेपाळी/बांगलादेशी/पाकिस्तानी असतात). आणि जर घरी जेवण बनवत असाल तर प्रश्नच नाही. भारतीय किराणा मालाची दुकानेही चिकार आहेत. फक्त भारतातला एव्हरेस्ट चा पाव भाजी मसाला आणि जपान मधला मसाला यांच्या किंमतीची तुलना मात्र करायची नाही. नाहीतर उपाशीच रहावे लागेल. इथे डिपार्टमेंटल स्टोअर मधे बऱ्याच भाज्या असतात. पालेभाज्यांपैकी फक्त पालकच ओळखता आला. मधून मधून कोथिंबीरीच्या २-४ काड्या असतात. बाकी भाज्या चवीला कशा लागतात आणि कशा बनवायच्या हेच माहिती नसल्याने पंचाईत. बाकीचे कांदे,बटाटे,टोमॅटो,फ्लॉवर,कोबी,भोपळी मिरची,गाजर,मुळा,लाल भोपळा असे नेहमीचे यशस्वी कलाकार असतातच ! शिवाय अंड खात असाल तर त्रास अजून कमी. पण सगळ्या रेस्टॉरंट बाहेर तिथे मिळणारे पदार्थ काचेच्या पेटीत असे काही सजवून ठेवलेले असतात की खाण्याचा मोह व्हावा ! शिवाय सबवे, मॅकडी मधे मांस,मासे वगैरे नसलेले फक्त भाज्या असलेले पदार्थ द्या म्हटल्यावर देतात :-) अर्थातच हे सगळे तोक्यो वगैरे सारख्या मोठ्या शहरात. तोक्यो बाहेर वेगळी परिस्थिती असू शकते आणि तिथे खाण्यापिण्याचे हाल (जर तुम्हाला जपानी खायचे नसल्यास) होऊ शकतात