सन्जोप राव,

अस कय करताय राव?

हे म्हणे कुठलेसे महाराज सतत म्हणत असत.

याचा अर्थ काय?

तुम्हाला ते जाणुन घ्यायचे आहे असे वाटले.

तसे बघीतले तर बरेच मनोरुग्ण अशी अर्थहीन बडबड करत असतात.

ते सगळेच महाराज की काय?

बेडोल शरीराचे, अर्धनग्न अवस्थेतले, गान्जाची चिलीम फुन्कणारे असे लोक अवतारी पुरुष कसे असू शकतात?

परन्तु वरील दोन वाक्याने तो माझा भ्रम होता हे तुम्ही लगेच सिध्द केलेत.

तुम्हाला कोणतीही गोष्ट सिध्द करायला आवडते किन्वा सिध्द  झाल्याशिवाय ती मानायला आवडत नाहे असे दिसते. असो.

(हलकेच घ्या पण..) तुम्ही सुध्दा काहीसे अर्थहीन लिहिलेत असे कोणाला तरी वाटु शकते. मग तुम्हाल काय म्हणावे?

एक विनन्ती, आहो लाखो लोकान्च्या भावना जेथे जोडल्या गेल्यात, जेथे त्यान्ची श्रध्दा एकवटलि आहे अशा नाजुक गोष्टीन्ची, विषयाची मान्डणी तरी जरा सबुरीन करत जा!

शब्द ब्रम्ह आहे हो. त्याचा जपुन वापर करावा.

आपणास त्या महा पुरुशाची योग्यता माहित नसेल तर ठीक, तुम्हाला ते जाणुन घ्यावेसे वाटत असेल तर आजुन छान.

पण, आपण ज्या पध्दतीने शब्द रचना केलीत ते वाचुन वाइट वाटले ... महराजन्बद्दल नव्हे... तुमचे हो!! तुमचा हेतु सदहेतु वाटत नाही.

आहो, काही गोष्टी ह्या आपल्या समजण्यापलिकडे असतात, म्हणजे त्या चुकीच्या, किन्वा त्याना काही अर्थ नाही असे थोडेच आहे.

असो, आपल्या माहीती साठी मी लिन्क  देतोय, वेळ काढुन जरुर वाचा.

http://www.gajanan-shegaon.com/

आजुन काही वाटल्यास लिहिनच ...

--सचिन