... सुटल्याची जाणीव हळुवारपणे करून दिल्याबद्दल कारकुनांस धन्यवाद!

जेव्हा लिहीत होतो तेंव्हा असेच विचार भरकटत जायचे... आता नुसत्या आठवणीनेही माझ्या एकट्याच्याच असलेल्या त्या जगात हरवून जातोय. पण ते जग काय आणि हे काय... एकट्याचेच शेवटी...

जुनी वही शोधायचे बऱ्याचदा ठरवतो... पण पुन्हा उद्यावर ढकलतो...

ह्म्म्म्म ... हे असेच चालायचे असे दिसतेय...

असो! तुमच्या शैलीची लागण व्हायला लागलेली दिसते आहे. येथेच थांबतो.

पण तुम्ही शेवटचे पान म्हणता आहात. त्यांतून थांबण्याचे सूचित करू नका ही विनंती! आम्ही वाचू आपले अंतरंग.. आणि आम्हालाही शोधू त्यांत. शुभेच्छा!!