माझी विधाने वाचून खूप नाकाना मिरच्या झोम्बल्या हे कळल्यावर वाईट वाटले. वाईट एवढ्यासाठी की गजानन (किन्वा तत्सम कुठ्ल्याही) महाराजान्चे हुबेहूब शारिरीक वर्णन ज्याना पचवता येत नाही त्यान्च्या श्रध्देला तरी काय अर्थ आहे?
देव, आत्मा, स्वर्ग, नरक, अवतारी पुरुष, महाराज... अशा गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही. अर्थात याबाबतीत मतभिन्नता असू शकते आणि इतर कुणाचेही मत माझ्या मताइतकेच सन्माननीय असू शकते हे मला मान्य आहे. कुणाच्याही श्रध्देवर चिखलफेक करण्याचा ना माझा हेतू आहे, ना अधिकार.
पण माझ्या मताविषयी मला आदर आहे, त्यमुळे माझी वैयक्तिक मते एका सार्वजनिक ठिकणी मान्डल्याबद्दल मला अजिबात अपराधी वाटत नाही. त्यामुळे कुणाची माफी मागण्याचा सवालच नाही.
तथापि एक जबाबदार नागरिक म्हणून ही चर्चा मी माझ्याबाजूने इथेच सम्पवत आहे.
शेवटी मुद्दा मनोरुग्णान्चा. मला मनोरुग्णाविषयी आत्यन्तिक सहानुभूति आहे. हेन्री डेव्हीड थोरो म्हणतो त्याप्रमाणे त्यान्चे एक वेगळे विश्व असू शकेल, आणि त्यात आपण सगळेच वेडे असू! त्यामुळे मनोरुग्णाविषयी माझ्या मनात अपार करुणेशिवाय इतर कोणतीही क्षुद्र भावना नाही. त्यान्ची बडबड ही आपल्याला निरर्थक वाटते, एवढाच माझ्या लिखाणाचा हेतू.