कुठेतरी वाचल्याचे आठवते,
बुवाबाजीवर मते देताना काही लोकांची वृत्ती अशी असते,
"माझा काही विश्वास नाही हा असल्या गोष्टींवर हे महाराज वगैरे सगळे भोंदू असतात. फक्त आमचे '---- महाराज' सोडून."
तीच वृत्ती इथेही दिसून आली.
गजानन महाराजांवर काही बोलले की ती चिखलफेक... आमच्या भावना दुखवायचा काय अधिकार?
पण तेच नरेंद्र महाराज किंवा आणि कोणा बाबा विषयी म्हटले की टाळ्या.. कपाळाला टिळा लावून खिशाला बिल्ला लावून फिरणाऱ्यांचा उपहास करताना आपणाही तेच करत आहोत ह्याची जाणीव नाही का?
नरेंद्र महाराज काय किंवा इतर कुणी काय ह्यांचा असा अपमान करण्याचा तुम्हाला तरी काहीही अधिकार नाही.
हिंदू धर्मातले तेहतीस कोटी देव कमी पडले म्हणून अवतार पुजणाऱ्यांना असा उपहास करण्याचा काय हक्क?