<<मला मनोरुग्णाविषयी आत्यन्तिक सहानुभूति आहे>>
मनोरूग्णही आपल्याविषयी असाच विचार करीत असणार.
असंबद्ध व हीन लेखन करून वर स्वतःला जबाबदार नागरिक म्हणविता?
जे कुणी या महाराजांचे शिष्य आहेत वा भक्त आहेत ते त्यांच्या देहयष्टिवर, चिलीमीवर वा गण गण गणात बोते या वचनावर भाळून भक्त झाले नसावेत. तुम्हाला जर जबाबदार चर्चा करायाची होती तर जरा सुसंस्कृत रितीने आपण सर्वाना विचारू शकला असतात तर की लोक या महाराजांवर श्रद्धा का ठेवतात? जर हे महाराज महान आहेत तर त्यांचे बाह्यरूप असे का? जर तुम्ही असे विचारले असतेत तर योग्य उत्तरे मिळाली असती.
आपले लेखन पाहता आपला हेतू हा ज्ञानसंपादन हा नसून आपली विद्वत्ता दाखविण्यासाठी इतराना मूर्खात काढणे हाच असल्याचे स्पष्ट आहे.