वरील प्रश्न डीसी मोटारीच्या संदर्भात जास्त विचारल्यास आवाजाची मजा औरच. शिवाय डिसी सप्लायची फ्रिक्वेन्सी किती, ह्यासारखे प्रश्नही आमच्या महाविद्यालयात लोकप्रिय होते.
तोंडी परीक्षेच्या आठवणी मोठ्या मजेदार आहेत. आमच्या बॅचमध्ये बऱ्याच मुली होत्या.
मुलींचे एक बरे होते. तोंडी परीक्षेत उत्तर आले नाही, अश्रू ढाळले की पास व्हायच्या. म्हणजे अशी एक दोन उदाहरणे आमच्या डोळ्यांसमोर घडली होती. अर्थात मुली कॅंटिनमध्ये बसून 'चेंगड' किंवा मस्ती करायच्या नाहीत. त्या उडाणटप्पू नव्हत्या. हजेरी चांगली असायची. ह्या गोष्टींचाही त्यांना फायदा मिळायचा.
पण मला आणि माझ्या काही मित्रांना आपणही धाय मोकलून रडावे व्हावे असे तेव्हा खूप वाटले होते. पण मात्रा चालली नसती.
चित्तरंजन