सन्जोप राव,
माझी विधाने वाचून खूप नाकाना मिरच्या झोम्बल्या हे कळल्यावर वाईट वाटले. वाईट एवढ्यासाठी की गजानन (किन्वा तत्सम कुठ्ल्याही) महाराजान्चे हुबेहूब शारिरीक वर्णन ज्याना पचवता येत नाही त्यान्च्या श्रध्देला तरी काय अर्थ आहे?
तुम्हाला वाईट वाटले!! आम्हा सगळ्यान्चे नशीबच की हो ... धन्यवाद बर का!!!
महाराजान्चे शारिरीक वर्णन --
सन्जोप राव, हाच तर फ़रक आहे हो तुमच्या / माझ्यासारख्या सामान्य माणसात आणि अवतारी पुरूष (व्यक्ती) मध्ये ... आपण शरीराला जास्ती महत्व देतो !
त्यान्चे विचार कधी जाणुन घ्यायचा प्रयन्त केलात का??
अवतारी पुरूष (व्यक्ती) हे या सगळ्याच्या पलिकडे गेलेले असतात.
नाकाला मिरच्या झोम्बल्या --
कसे आहे, अगदी आडाणी माणसे सुद्धा साधा शिष्टाचार पाळतात , की म्हातार्याला म्हातारा, किन्वा अन्ध व्यक्तीला आन्धळा... असे रोकठोक कधी म्हणु नये. त्यामुळे
त्या व्यक्तीला वाईट वाटु शकते, त्याचे मनाला दुःख पोचु शकते.
इथे तर लाखो लोकान्च्या भावना, श्रध्दा तुम्ही दुखावताय!!
बेडोल शरीराचे, अर्धनग्न अवस्थेतले, गान्जाची चिलीम फुन्कणारे
महाराज (किन्वा इतर अवतारी व्यक्ती ) जरी असे असले तरी ते फ़क्त त्याचे वर्वर्चे रुप ... त्यातुन काय घ्यायचे / समजायचे हे ज्याच्या त्याच्या बुध्दीच्या कुवतीनुसारच ठरणार !!
तुम्ही फ़क्त बाह्यान्ग बघितले नी तारे तोडले !
त्यान्चे विचार कधी जाणुन घ्यायचा प्रयन्त केलात का??
अर्धनग्न -- आहो जे शरीर सगळेजण त्याला केवढे महत्व देतात त्याचा मोह केवढा असतो आपल्याला,
त्याचाच 'मोह' त्यानी टाकुन दिला होता.
आपण तर अगदी साध्या साध्या गोष्टीन्चा मोह धरतो .. नी मग त्यापाठोपाठ सगळी दुःखे जवळ करीत असतो. तुम्हाला जमेल का एक तरी मोह दूर कराय्ला...
चहा पित असाल तर ... जाणवेल की आपण साधे ते सुद्धा सोडु शकत नाही ... एखादे व्यसन असेल तर ते सुध्दा ...
बेडौल शरीर -- माफ़ करा, पण आपण स्वतः काय एकदम 'अर्नॉल्ड' की 'सिल्वेस्टर स्ट्यालोन' हो?
सगळ्या सोयी आपण आपले शरीर सन्भाळु शकत नाही ... स्वतःवरुन जग ओळखावे ...
चिलिम फ़ुकणारे -- एका अर्थी 'मी' तुमच्या सारखाच सामन्य माणसु आहे हेच ते दर्शवतात.
दुसरे असे की , ते ही एक मानुसच , आणि मानुस म्हटला की गुणदोष असणारच की... १०० % चान्गला ,सर्वगूणसम्पन्न असा मानुस सापडणे केवळ अशक्य !!!
फ़रक हा की अशा लोकान मधे चान्गल्या गुणान्चे प्रमाण अधिक असते म्हणुन आपन त्याना 'देव माणुस' किन्वा '.अवतारी पुरुष' असे म्हनतो
ज्याच्यात दुर्गुणाची वाढ जास्ती होते त्याला आपण 'राक्षस' म्हणतो.
तेव्हा हे आपण समजुन घ्यायलाच हवे.
शारिरीक वर्णन ज्याना पचवता येत नाही त्यान्च्या श्रध्देला तरी काय अर्थ आहे?
पचवता येत नाही -- हम्म्म्म , बरोबर आहे... कसे पचणार ... आहो आम्हि काय 'गजानन महाराज' आहोत का? आम्ही साधी माणसे आहोत. राग लोभ ... असे अनेक गुणावगुन आसलेले.
****
मी पुढे एक वाक्य लिहिणार आहे ते तुम्हाला पचते का ते जरुर कळवा...
****
केवळ तुमची पचन शक्ती किती आहे येवढेच बघायचेय मला ...
श्रध्देला काय अर्थ -- आहो तुम्हाला काय लोकान्च्या श्रध्देचा अर्थ लावायचे कोणी 'कन्त्राट' दिलेय का??
तुम्हाला नाही पटत तर ठेवा की तुमच्या जवळ... आम्ही नव्हतो आलो तुमच्याकडे विचाराय्ला की अशा तथाकथीत महाराजान्विषयी तुमचे काय विचार / श्रध्दा आहेत हे जाणुन घ्यायला ....
बाकी मी आधीच्या प्रतिसादातही लिहिलेच आहे ... अशा विभुतिन्विषयी जाणुन घ्यायची प्रामाणिक इच्छा आसेल तर वेगळे ... पण केवळ टीकाच करण्याच्या द्रुष्टीने लिहिणे योग्य नव्हे...
काळा चष्मा वापरला की सगळेच काळे दिसते ...
आपल्या लिखाणाला एक प्रकारच्या हेटाळाणीचा आणि मी म्हणजे एकदम 'मॉड' विचारन्चा असा गन्ध येतोय.
तुमचे विचार तुम्ही चान्गल्या शब्दातही मान्डु शकले असता... परन्तु ते तुम्ही मुद्दामच टाळले असे वाटतेय ... किन्वा तुमचा आजचा प्रतिसाद वाचुन असे खेदाने म्हणावे वाटते की तुमचे भाषेवरील प्रभुत्व फ़ारच कमी आहे.
आपले म्हणने (मग भले ते चुकीचे की बरोबर) हे लोकाना चान्गल्या / कन्विन्सिन्ग भाषेत सान्गायला जमलेच पाःईजे ...
नाहीतर आपण फ़क्त 'शिक्षीत'/'साक्षर' आहात 'सज्ञान' नव्हे असेच म्हणावे लागेल.
तथापि एक जबाबदार नागरिक म्हणून ही चर्चा मी माझ्याबाजूने इथेच सम्पवत आहे.
हम्म्म, आपण जबाबदार आहात हे जाणुन खुप खुप आनन्द झाला बर का!!
शेवटी मुद्दा मनोरुग्णान्चा. मला मनोरुग्णाविषयी आत्यन्तिक सहानुभूति आहे. हेन्री डेव्हीड थोरो म्हणतो त्याप्रमाणे त्यान्चे एक वेगळे विश्व असू शकेल, आणि त्यात आपण सगळेच वेडे असू! त्यामुळे मनोरुग्णाविषयी माझ्या मनात अपार करुणेशिवाय इतर कोणतीही क्षुद्र भावना नाही. त्यान्ची बडबड ही आपल्याला निरर्थक वाटते, एवढाच माझ्या लिखाणाचा हेतू.
अगदी बरोबर लिहिलेत ... त्यान्चे वेगळे विश्व ... हेच तर !! प्रत्येकाचेच वेगळे विश्व असते ... अवतारी लोक असेच असतात ... त्यान्चे एक वेगळेच विश्व असते ... आपल्यात असुनही ते आपल्यापेक्षा वेगळे असतात ... हेच आपण समजुन घेतले पाहीजे ...
सगळ्या गोष्टीना आपल्याच नियमाने तोलुन कसे बरे चालेल ...
... क्रिकेट हा खेळ क्रिकेट चेच नियम लावुन खेळावा लगणार ... कोणी म्हणाले की नाही मला फ़ूट्बॉलचे नियम लवुन खेळायचेय क्रिकेट तर चालेल का हो?
ते लोक आपल्यापेक्षा वेगळे असतात येवढेच ध्यानात घ्यावे ... त्यानी आपल्यासरखेच असायला हवे हा अट्टाहास कशासाठी ??
त्यानी कधी तुम्हाला (लोकाना) सन्गितले का की तुम्ही कपडे वापरु नका? व्यायाम करु नका? मग !!!
तुमची पचन शक्ती --
स्निग्धस्निग्धा यानी सान्गितलेच की मनोरुग्न काहीही अर्थ्हीन बरळत नाहीत... आपणास जे समजत नाहे ते सगळे अर्थ हीन असे कसे काय होते ...?
****
बाकी तुमचेही लिखाण काही तरी च बरळल्यासारखे वाटते ... तुम्ही कोणत्या क्याट्यागरीतले ???
(हलकेच घ्या )
****
कोणत्याही गोष्टीकडे सकारत्मक द्रुष्टीने बघीतले , विचार केला तर आपणास त्यातुन चान्गलेच सापडते ... प्रयत्न करुन बघा ...
आधीच नकारात्मक विचार ठेवाल तर हाती चान्गले काही सापडणे अवघड...
एकच विनन्ती ... अशा खुल्या व्यासपीठावरती काहीही लिहिताना लोकान्च्या भावनान्चा विचार जरुर करावा ...
दुसर्याना दुखवणे फ़ारच सोपे आहे हो ... एखाद्याला आनन्द देणे फ़ारच अवघड.
दुसर्याना आनन्द देता येत नसेल तर ठीक आहे , अगदी चालेल ... पण कीमान आपल्या मुळे दुसर्याला दुःख होणार नाही याची काळजी घ्ययला काय हरकत आहे.
नोन्द घ्या - मी काही गजानन महारजान्चा भक्त आहे आसे नव्हे, फ़क्त ते समाजात पूजनीय आहेत , लोकान्च्या भावना, श्रद्धा यान्चा आपण आदर ठेवावा येवढेच म्हनुन हा सगळा प्रपन्च ....
असो आता पुरे करतो ... (प्रतिसाद आणि चर्चा सुध्दा!!)
--सचिन