तुम्हाला जर जबाबदार चर्चा करायाची होती तर जरा सुसंस्कृत रितीने आपण सर्वाना विचारू शकला असतात तर की लोक या महाराजांवर श्रद्धा का ठेवतात? जर हे महाराज महान आहेत तर त्यांचे बाह्यरूप असे का?जर तुम्ही असे विचारले असतेत तर योग्य उत्तरे मिळाली असती.

ठीकाय, सर्वसाक्षी महोदय. आपल्या वरील उदगारांवरून काही प्रश्न सुचले आहेत, तेच मांडतो आहे.

गजानन महाराज कुठले? कृपया त्यांचा जीवनप्रवास सांगावा.
त्यांचे जीवनविषयक तत्वज्ञान काय? त्यांचा आपल्या भक्तांना उपदेश काय?
अर्धनग्न अवस्थेचे, गांजाची चिलीम फुंकण्याचे स्पष्टीकरण काय?
नि शेवटचा प्रश्न(हा अनेक भक्तांना उद्धट वाटेल, पण माझा नाईलाज आहे.)
आजचे नरेंद्र महाराज नि हे गजानन महाराज यांत फरक काय?(कृपया सखोल विवेचनासह स्पष्ट करावे.)

कलोअ,

एक_वात्रट

(वि. सू. या प्रश्नांमधे कुणाचीही अवहेलना करण्याचा किंवा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. आपल्याला तसे वाटल्यास माझा नाईलाज आहे.)